23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरअर्थजगतशिवसेनेचे खासदार , व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाळ धूत यांना अटक

शिवसेनेचे खासदार , व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाळ धूत यांना अटक

आयसीआयसीआय बँक आर्थिक फसवणूक प्रकरण

Google News Follow

Related

चंदा कोचर यांच्या नंतर आता केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने आयसीआयसीआय बँकेच्या फसवणूक प्रकरणांमध्ये शिवसेनेचे खासदार आणि व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाळ धूत  केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाचे अप्रमणिक वर्तन आणि नुकसान केल्याचा धूत यांच्यावर आरोप करण्यात आला आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

आयसीआयसीआय बँकेने २०१२ मध्ये व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिले होते. त्यानंतर ते एनपीए झाले. सप्टेंबर २०२० मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचर यांना अटक केली होती. चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील आयसीआयसीआय बँकेने बँकेने व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला ६४ कोटींचे कर्ज दिले. यामध्ये दीपक कोचर यांचा ५० % हिस्सा होता. आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉनचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व बँक आणि सीबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाळ धूत आणि आयसीआयसीआयच्या सीईओ व एमडी चंदा कोचर यांच्यावर एकमेकांची बाजू घेत असल्याचा आरोप केला.

धूत यांची कंपनी व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकडून ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या नुपॉवर या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये पैसे गुंतवले असा आरोप करण्यात आला. चंदा कोचर यांनी आपल्या पतीच्या कंपनीसाठी धूत यांना अनुकूलता देण्याचा आरोप आहे. याचा खुलासा २०१८ मध्ये झाल्यानंतर चंदा कोचर यांना बँकेचा राजीनामा द्यावा लागला होता.

हे ही वाचा:

सावरकरांच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची अंमलबजावणी केली असती तर…

कर्नाटकातील कला संस्कृतीच्या जपणुकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

तुम्ही आधारकार्ड पॅनशी लिंक केले आहे का ?

अफगाणी महिलांना एनजीओमध्ये काम करण्यास मनाई; तालिबानी आदेश

सीबीआयने यापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्रकरणी प्राथमिक चौकशी नोंदवली होती. २०१९ मध्ये न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण समितीचा अहवाल आला. कोचर यांनी व्हिडिओकॉनला कर्ज देताना बँकेच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे समितीच्या समितीच्या चौकशीत आढळून आले. कोचर यांच्या मान्यतेवर या कर्जाचा काही भाग त्यांचे पती दीपक यांच्या मालकीच्या कंपनीला देण्यात आल्याचे दिसून आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा