सीबीआयने केलेल्या एका धडक कारवाईत दिवाण हाऊजिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे (डीएचएफएल) प्रमोटर कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि काही अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २.६० लाख खोटी कर्ज खाती निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तपास यंत्रणेच्या एफआयआरनुसार वाधवान बंधुंनी नकली गृह कर्ज खाती तयार केली होती, जी एकूण ₹१४,००० कोटींची होती. यापैकी ₹११,७५५.७९ कोटींची खाती आणखी एका नकली कंपनीकडे वळवण्यात आली होती.
हे ही वाचा:
युजीसीने केलेल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातील बदलांमुळे बुद्धीजीवींचा पोटशूळ
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
२६/११ चा आरोपी तहव्वुर राणा लवकरच भारताच्या ताब्यात?
डीएचएफएलने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जांवरील व्याज दरातील सुमारे ₹१,८८० कोटींची सुट देखील उपभोगली होती.
सीबीआयकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार डिसेंबर २०१८ मध्ये डीएचएफएलने त्यांच्या गुंतवणुकदारांना सांगितले की पीएमएवाय योजनेअंतर्गत एकूण ८८, ६५१ कर्जे दिली आहेत आणि ₹ ५३९.४ कोटी अनुदान म्हणून मिळाले असून अजून सरकारकडून ₹१,३४७.८ कोटी येणे बाकी आहे. परंतु, या गैरव्यवहाराच्या चौकशीनंतर त्यांनी सुमारे २.६ लाख नकली खाती उघडली होती, ज्यातली बहुतेक पीएमएवाय योजने अंतर्गत उघडण्यात आली होती आणि या योजने अंतर्गत व्याजावर देण्यात येणाऱ्या अनुदानावर दावा केला होता. त्यासाठी बांद्रा येथील त्यांच्या नकली शाखेचा वापर त्यांनी केला होता.
वाधवान बंधुंची आधीच सीबीआय आणि ईडीकडून राणा कपूर यांचा सहभाग असलेल्या येस बँक घोटाळ्याची आणि पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी चालू आहे.