कोरोना महामारीच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था कमकुवत झाली असली तरी कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अहवालात ही बाब समोर आली आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारलाही वित्तीय तूट तीन टक्क्यांच्या खाली आणण्यात यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. आहे. मात्र, राज्याचा आर्थिक विकास दर (जीडीपी) तीन टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे.
कॅगचा अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. कॅगच्या अहवालानुसार २०१६-१७ मध्ये राज्याचे कर्ज ४ लाख कोटी रुपये होते. हे कर्ज वाढून आता ५ लाख ४८ हजार १७६ कोटी झाले आहे. कोरोना साथीचा आजार आणि त्याला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यात आले. याचा आर्थिक स्थितीवरही परिणाम झाल्याचे कॅगने म्हटले आहे. राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या आर्थिक शिस्तीबद्दल कॅगने त्यांचे कौतुक केले आहे.
महसुलात १३. ७ % घट
मागील वर्षीच्या तुलनेत राज्याच्या कर महसुलात १३.७ टक्क्यांनी घट झाल्याचे कॅगने म्हटले आहे. २०१९-२० मध्ये महसूल २ लाख ८३ हजार १८९.५८ कोटी रुपये होता. २०२०-२१ मध्ये महसूल दोन लाख ६९ हजार ४६८. कोटी इतका कमी झाला. जीएसटी १५.३२ टक्क्यांनी कमी झाला आहे. व्हॅटमध्ये १२.२४ टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचे कॅगने म्हटले आहे. एकूण महसुली खर्चापैकी ५७.३३ टक्के राज्य सरकारचे कर्ज व्याज, वेतन आणि पेन्शनवर खर्च केले जाते. ४१ हजार १४१.८५ कोटी महसुली खर्चात कपात झाल्याने महसुली तूट निर्माण झाली आहे.
हे ही वाचा:
प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात
नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक
दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या
पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ
कृषी क्षेत्राचे सकारात्मक याेगदान
कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असताना दुसरीकडे कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेत सकारात्मक योगदान दिले आहे. कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे ज्याने सकारात्मक चित्र दाखवले. राज्याच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा ११ टक्के आहे. तर राज्यातील औद्योगिक क्षेत्रात ११.३ टक्क्यांनी घट झाली आहे. कॅगने म्हटले आहे की, सेवा क्षेत्रात ९ टक्क्यांची घसरण झाली आहे.