‘बायजू’ कंपनीने केला दिवाळखोरीसाठी अर्ज

‘बायजू’ हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्टअपपैकी एक

‘बायजू’ कंपनीने केला दिवाळखोरीसाठी अर्ज

भारतीय स्टार्टअप कंपनी ‘बायजू’च्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ‘बायजू’ स्टार्टअपच्या अमेरिकेतील युनिटने अमेरिकन न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. या युनिटवर तब्बल १ अब्ज ते १० अब्ज डॉलर पर्यंतचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.

बायजू रवींद्रनचे स्टार्टअप ‘बायजू’ हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्टअपपैकी एक होते. शिवाय २०२२ मध्ये त्याचे मूल्य २२ अब्ज डॉलर होते. त्यानंतर आता बायजूच्या काही गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की, स्टार्टअपचे मूल्यांकन हे ३ बिलियन डॉलर पर्यंत घसरले आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी बायजूचे सीईओ बायजू रवींद्रन यांना बोर्डातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. शिवाय आता कंपनीच्या अमेरिकन युनिट बायजूच्या अल्फाने दिवाळखोरी याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

मालदीवमधून १० मेपर्यंत भारतीय सैनिक मायदेशी परतणार

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

दिवाळखोर पाकिस्तान आता मालदीवला मदत करणार!

या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत मिळत नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जानेवारी महिन्याचा पगार मिळण्यास उशीर होणार असल्याची माहिती आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्फाने दिवाळखोरी याचिका दाखल केल्याने बायजू यांना थोडा दिलासा मिळू शकतो. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, “काही गुंतवणूकदारांनी आमच्या अडचणी पाहिल्या आणि त्यांनी कट रचण्याची ही एक उत्तम संधी मानली. संस्थापकाला Byju’s चे ग्रुप सीईओ म्हणून काढून टाकण्याची मागणी केली. हे पाहून खूप वाईट वाटत आहे.” काही गुंतवणूकदारांनी वाद निर्माण केल्यामुळे जानेवारी महिन्याच्या पगाराच्या वितरणात थोडा उशीर होणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

Exit mobile version