30 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरअर्थजगतबस उत्पादकांना लसीकरणानंतर तेजीची आशा

बस उत्पादकांना लसीकरणानंतर तेजीची आशा

Google News Follow

Related

कोविडचा फटका मोठ्या प्रमाणात जगातील सर्व अर्थव्यवस्थांना बसला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंद्यांना तोटा झाला आहे. त्यामध्ये वाहन उद्योगाला देखील मोठा फटका बसला होता, विशेषतः बस उत्पादनाला देखील मोठा फटका बसला होता.

देशातील वाहन उत्पादन खालावले असून, सद्यस्थितीत बस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीवरील हात आखडता घेतला आहे. त्याऐवजी अनेक बस उत्पादकांनी इलेक्ट्रिक बसकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच अशोक लेलँड, टाटा मोटर्स यांसारखे बडो उद्योजक पुन्हा एकदा परिस्थिती पुर्ववत होण्याची अपेक्षा बाळगून आहेत.

माहामारीमुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. मागणी घटल्याने स्वतःच इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर गुंतवणुकदार या उद्योगात गुंतवणुक करण्यास उत्सुक नसल्याचे आढळून आले आहे.

हे ही वाचा:

…तर खासगी बस व्यवसाय बंद पडेल!

धक्कादायक! संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे भाडे झाले सहापट

ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

अशोक लेलँड यांचा आंध्र प्रदेशमधील कारखाना मार्च महिन्यात चालू होणार होता, मात्र देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी घटल्यामुळे उत्पादनक्षमता वाढवण्याची कोणतीही गरज शिल्लक राहिलेली नाही. त्याबरोबरच टाटा मोटर्सकडून देखील उत्पादनक्षमता वाढवण्याचा विचार काही काळासाठी रहित केला गेला असल्याचे देखील कळले आहे.

मात्र सध्याच्या महामारीच्या काळाचा फायदा करून घेत अनेक बस कंपन्या आधुनिकीकरणाकडे वळत असल्याचे देखील कळले आहे. त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल अशी यंत्रणा खेडोपाडी तयार होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागणार असल्याचे मत देखील काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले गेले आहे. त्या भागात सध्या देखील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी, सीएनजीवरील वाहने अधिक लोकप्रिय आहेत.

बसेसच्या मागणीला लसीकरणानंतर जोर येईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. लसीकरणानंतर जेव्हा पुन्हा एकदा सामान्य जीवन चालू होईल, शाळा चालू होतील, त्यानंतर पुन्हा एकदा बसेसची मागणी वाढू शकेल अशी आशा बस उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा