जगभरात सध्या डिजिटल चलनाची चलती असताना भारतीय अर्थव्यवस्थेतसुद्धा याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२२ मध्ये डिजिटल चलनाबाबत मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आरबीआयचे डिजिटल चलन ‘डिजिटल रुपया’ नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लाँच केले जाईल.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रुपयाची ओळख करून दिली जाणार आहे. यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. चलन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि कमी खर्चिक बनवेल.
भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे की, ते स्वतःचे डिजिटल चलन घेऊन येईल. मध्यवर्ती बँक टप्प्याटप्प्याने ते सुरू करण्याच्या धोरणावर काम करत आहे. केंद्रीय बँक घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ते सादर करण्याच्या प्रक्रियेत आहे.
हे ही वाचा:
Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा
Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी ‘गती शक्ती’
Budget 2022: ‘६० लाख नवे रोजगार निर्माण करणार’
Budget 2022 : या वर्षात भारतीयांना मिळणार ‘5G सेवा’
क्रिप्टोकरन्सीवर ३० टक्के कर
३० टक्के कर क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर वर लावला जाणार आहे. याशिवाय एक टक्के TDS देखील आकारला जाणार आहे. खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोरोना महामारीनंतर देशाची अर्थव्यवस्था सुधारली आहे.
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा डिजिटल देश होण्याच्या वाटेवर आहे. मात्र, आतापर्यंत भारताकडे कोणतीही योजना डिजिटल चलनाबद्दल नव्हती. आता सरकारने बजेटमध्ये डिजिटल चलनाची मोठी घोषणा केल्यामुळे क्रिप्टोकरन्सी विश्वस्त भारत पदार्पण करणार आहे.