‘मोदी 3.0’ चा नवसंकल्प!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

‘मोदी 3.0’ चा नवसंकल्प!

केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवार, २३ जुलै रोजी संसदेत मांडला जात असून मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. याकडे देशासह साऱ्या जगाचे लक्ष आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता मांडला.

यावेळी निर्मला सीतारमण यांनी प्रमुख नऊ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. देशातील नऊ क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. विकसित भारताचा रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

  1. शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता
  2. रोजगार आणि कौशल्ये
  3. सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
  4. उत्पादन आणि सेवा
  5. शहर विकास, नागरी विकास
  6. ऊर्जा सुरक्षा
  7. पायाभूत सुविधा
  8. नवोपक्रम, संशोधन आणि विकास
  9. पुढच्या पिढीतील सुधारणा

हे ही वाचा:

कॅनडात खालिस्तानी समर्थकांकडून मंदिराची तोडफोड; भित्तिचित्रे काढून विद्रूप करण्याचा प्रयत्न

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना”

२०२५ च्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ६.५ ते ७ टक्के राहणार

देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले

२०२४-२५ चा पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. प्रस्थापित परंपरेनुसार अर्थमंत्र्यांनी संसदेत जाण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी सीतारामन यांना परंपरेनुसार दही आणि साखर खाऊ घातली. यानंतर अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.

Exit mobile version