अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीची केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला. वाढत्या महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा असतात. त्यामुळे बजेटकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले होते. विविध क्षेत्रांसाठी बजेट मध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशात काही वस्तू महाग आणि काही वस्तूंच्या किमती खाली येणार आहेत. जाणून घेऊया सामान्य अर्थसंकल्पानंतर आता देशात कोणत्या वस्तू महाग होणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किंमतीत कपात होणार आहे.
काय स्वस्त होणार?
- कपडे
- चामड्याचा वस्तू
- इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
- मोबाईल फोन, चार्जर
- हिऱ्याच्या वस्तू, दागिने
- शेतीची अवजारे
- कॅमेरा लेन्सेस
- इंधन स्वस्त होण्याचे संकेत
- इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणा
- परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त होतील
- जीएसटीमध्ये सुधारणा
काय महाग होणार ?
- क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग
- छत्र्या महाग
- आयात होणाऱ्या सर्व वस्तूंसाठी मोजावी लागणार अधिक रक्कम
- इमिटेशन ज्वेलरीवर प्रति किलो ४०० रुपये कस्टम ड्युटी
- भांडवली वस्तूंवरील सूट संपणार
हे ही वाचा:
Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा
Budget 2022: अर्थमंत्र्यांनी करांसंबंधित काय केल्या घोषणा…
Budget 2022: शेती क्षेत्रात ड्रोन्सचा वापर होणार
Budget 2022: अर्थसंकल्पाला ‘बाजारातून’ सकारात्मक प्रतिसाद
त्याशिवाय, राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा लाभांत मदत करण्यासाठी आणि त्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर कपातीची मर्यादा दहा टक्क्यावरून वरून १४ टक्के करण्यात येणार आहे.