Budget 2022 : केंद्र सरकारने जारी केलेले आतापर्यंतचे सर्वोच्च क्रीडा बजेट

Budget 2022 : केंद्र सरकारने जारी केलेले आतापर्यंतचे सर्वोच्च क्रीडा बजेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सरकारची क्रीडाविषयक भूमिका सर्वांसमोर मांडली. अर्थसंकल्पीय भाषणात क्रीडा अर्थसंकल्पाचा उल्लेख करण्यात आला नव्हता, परंतु यावेळी क्रीडा विभागासाठी बजेटमध्ये तीनशे कोटी रुपयांपर्यंत निधी वाढवल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी अर्थसंकल्पात राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमासाठी निधीची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी १०८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर यावेळी १३८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे खेलो इंडिया कार्यक्रमाचे बजेटही वाढवण्यात आले आहे, मागील वर्षी ते ८७९ कोटी रुपये होते, ते यावेळी ९७४ कोटी रुपये करण्यात आले आहे. यावेळी क्रीडा बजेटमध्ये ३०५.५८ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकूल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सरकारने क्रीडा अर्थसंकल्पात निधीची वाढ केली आहे.

हे ही वाचा:

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा

Budget 2022: शेती क्षेत्रात ड्रोन्सचा वापर होणार

Budget2022 : RBI द्वारा ‘डिजिटल रुपया’ सादर होणार

त्याशिवाय मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल स्पोर्ट फॉउंडेशनला फटका बसला होता. २०१८-१९ मध्ये या क्षेत्राला ३४२ कोटींची मंजूरी मिळाली होती. पण मागील अर्थसंकल्पात यात घट झाली होती. त्यांना केवळ २४५ कोटी मिळाले होते.
२०१६ पासून ‘खेलो इंडिया’ या योजनेअंतर्गत सरकार क्रीडा क्षेत्राला पोत्साहन देत आहे. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनच्या तुलनेत खेलो इंडियासाठी मोठ्या तरतुदी करण्यावर सरकारने सकारात्मकता दाखवली आहे.

२०१६ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात मिळून मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. २०१६ पासून २०२० पर्यंत खेळासाठी अर्थसंकल्पातील तरतूद तब्बल ८९० कोटींवर पोहचली.

Exit mobile version