Budget 2022 : या वर्षात भारतीयांना मिळणार ‘5G सेवा’

Budget 2022 : या वर्षात भारतीयांना मिळणार ‘5G सेवा’

निर्मला सीतारामन चौथे अर्थसंकल्पीय बजेट सादर करत आहेत. त्यांनी डिजिटल विश्वासाठी मोठी घोषणा केली आहे. या वर्षात भारतीयांना 5G सेवा मिळणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. याशिवाय महागड्या फोनवरील कर कमी होण्याची अपेक्षा आहे.

२०२२ मध्ये 5G सेवा देशात सुरू होणार आहे. सर्वात आधी देशातील तेरा शहरात ही सर्विस सुरू केली जाणार आहे. विभागाने १३ शहराची लिस्ट जारी केली आहे. स्मार्टफोनच्या किमती तशाच राहू शकतात. महागड्या फोनवरील कर कमी होऊ शकतो.

सेमीकंडक्टर चिप्सचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, सरकार करात बदल करून अधिकाधिक स्मार्टफोन कंपन्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्मार्टफोन तयार करतील. त्यामुळे वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासही मदत होणार आहे.

हे ही वाचा:

Budget 2022: ‘६० लाख नवे रोजगार निर्माण करणार’

Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी ‘गती शक्ती’

Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

कोरोना विषाणूमुळे, टॅब्लेट आणि लॅपटॉपसारख्या घरातील गॅझेटमधून काम करण्याची मागणी वेगाने वाढली आहे. अशा परिस्थितीत सरकार या उपकरणांवरील कर कमी करू शकते, जेणेकरून अधिकाधिक लोक ही उपकरणे खरेदी करू शकतील, असे मानले जात आहे. आणि  या सर्वाचा विचार करून देशात  5G सेवा जरी केली जाणारा आहे.

Airtel, Jio आणि Vodafone Idea सारख्या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी गुरुग्राम, बेंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, पुणे आणि गांधीनगर येथे 5G ट्रायल साइट सेटअप केली आहे. या वर्षी मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. ही देशातील पहिली काही शहरे असणार आहेत, ज्या ठिकाणी 5G सुरु होणार आहे.

Exit mobile version