Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. १ फेब्रुवारी म्हणजेच आज आर्थिक वर्ष २०२२- २३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. सकाळी ९ वाजता निर्मला सीतारमण या आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील. ११ वाजता त्या अर्थसंकल्प सादर करतील.

कोरोनाची महाभयंकर दुसरी लाट ओसरल्यानंतरचा आणि तिसरी लाट ओसारण्याच्या उंबरठ्यावर असतानाचा हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे यंदाही आरोग्य क्षेत्रासाठी अधिक तरतूद राहण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या टॅबमधून कुठल्या क्षेत्रासाठी काय तरतूद असणार आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा:

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम

मुंबई, नागपूरसह दहा नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर? प्रशासक नेमणार?

आता गांजाच्या लागवडीस परवानगी द्या!

यंदाच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अभियानाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शेतकरी, नोकरदार वर्ग, पर्यटन, उद्योजक, आरोग्य क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प कसा राहणार याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version