Budget 2022: शेती क्षेत्रात ड्रोन्सचा वापर होणार

Budget 2022: शेती क्षेत्रात ड्रोन्सचा वापर होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. सलग दुसऱ्या वर्षी अर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडताना कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा अधिक प्रयत्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. हे ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, किटकनाशकांच्या फवारणीसाठी तसेच जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी वापरले जाणारे आहेत. कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. गंगा नदीच्या किनाऱ्यांवर शेतीला विशेष प्राधान्य देण्यासाठी योजना आखण्यात आल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा

Budget 2022: अर्थमंत्र्यांनी करांसंबंधित काय केल्या घोषणा… 

Budget 2022: अर्थसंकल्पाला ‘बाजारातून’ सकारात्मक प्रतिसाद

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

९ लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी ४४ हजार ६०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच लघु उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विकास करता यावा त्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे म्हणून विशेष अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

याचबरोबर रेल्वे, विद्यार्थी, ५जी सेवा, रोजगार यासंबंधीच्या महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत.

Exit mobile version