बीपीसीएलने नुमालीगढ तेल शुद्धीकरण कारखान्यातील विकली भागीदारी

बीपीसीएलने नुमालीगढ तेल शुद्धीकरण कारखान्यातील विकली भागीदारी

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या कंपनीचे लवकरच खासगीकरण होऊ घातले आहे. या पार्श्वभूमीवर या कंपनीने आसाममधील नुमालीगढ येथील तेल शुद्धीकरण कारखान्यातील सगळी म्हणजे सुमारे ६१.५ टक्के हिस्सेदारी विकून टाकली आहे.

खासगीकरणाच्या वाटेवर असलेल्या या कंपनीने आपला हिस्सा ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल), इंजिनिअर्स इंडिया आणि आसाम सरकारला सुमारे ₹९,८७६ कोटींना विकला आहे.

या व्यवहारानंतर ऑईल इंडियाला एनआरएलमधील सुमारे ५४.१६ टक्क्यांचा हिस्सा विकला गेला आहे. यापूर्वी ऑईल इंडियाकडे सुमारे २६ टक्के भागीदारी होती. या व्यवहारामुळे एनआरएल मध्ये ऑईल इंडियाची एनआरएलमधील वाटा ८०.१६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

हे ही वाचा:

सीएएसाठी भाषण करणारे मनमोहन आता त्याचा विरोध करतात; हाच काँग्रेसचा खरा चेहरा

बांग्लादेशमधील हिंदू भाविकांना मोदी सरकारची अनोखी भेट

कोविडपासून लसीची सुरक्षा लहानग्यांनाही मिळणार?

इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडने (ईआयएल) एनआरएलमधील सुमारे ४.४ टक्के हिस्सा स्वतंत्रपणे खरेदी केला आहे.

बीपीसीएलने दिलेल्या माहितीनुसार यानंतर उरलेले २.२९ कोटी समभाग आसाम सरकारला सुमारे ₹५०० कोटींना विकण्यात आले. त्यामुळे आसाम सरकारच्या १२.३५ टक्के हिस्सेदारीत साधारणपे ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हा सगळा व्यवहार बीपीसीएलच्या संचालक मंडळाने कंपनीचे नुमलीगढ़ तेल शुद्धीकरण कारखान्यातील हिस्सेदारी विकायला परवानगी दिल्यानंतर झाला. याच वेळेला ऑईल इंडिया लिमिटेड, इंजिनियर इंडिया लिमिटेड आणि आसाम सरकारला विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एनआरएलला बीपीसीएलमधीन वेगळे काढण्यात आले आणि आता तो खासगीकरणाचा भाग नसेल.

या व्यवहारातून ओआयएलला फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत. एनआरएल हा ईशान्य भारतातील तेल विहीरींतून ओआयएलने काढलेल्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. बीपीसीएलकडे या तेल शुद्धीकरण कारखान्याच्या विक्रीनंतर मुंबई, कोची आणि बिना (मध्य प्रदेश) येथील तेल शुद्धीकरण कारखाने शिल्लक आहेत.

या कंपनीचे खासगीकरण कोरोना महामारीमुळे रखडले होते. ते पुढील आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version