बीपीसीएलच्या खासगीकरणाला सुरवात

बीपीसीएलच्या खासगीकरणाला सुरवात

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची (बीपीसीएल) निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि सप्टेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. बीपीसीएलमध्ये सरकार आपला संपूर्ण ५२.९८ टक्के हिस्सा विकत आहे. त्याला आतापर्यंत देशातील सर्वात मोठे खासगीकरण म्हटले जात आहे. गुरुवारी बाजार बंद होताना कंपनीचे बाजारमूल्य ९०८८० कोटी रुपये होते. या प्रकरणात सरकारी हिस्सेदारीचे मूल्य सुमारे ४८ हजार कोटी रुपये असेल.

वेदांत समूहाने आणि भारतीय खासगी इक्विटी कंपन्या अपोलो ग्लोबल आणि आयस्क्वेड कॅपिटल, थिंक गॅस यांनी बीपीसीएलमधील शासनाच्या भागभांडवल खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे पत्र सादर केले. टाईम्स नेटवर्क इंडियाच्या आर्थिक परिषदेला संबोधित करताना पांडे म्हणाले, “बीपीसीएलची निर्गुंतवणूक प्रक्रिया चांगली सुरू आहे. आम्हाला आशा आहे की, हे २०२१-२२ च्या उत्तरार्धात पूर्ण होईल. या महिन्याच्या सुरुवातीला बीपीसीएलने आसाममधील नुमालीगड रिफायनरीमधून बाहेर पडायला सुरुवात केली. बीपीसीएलनं संपूर्ण हिस्सा ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये आणि इंजिनीअर्स इंडिया लिमिटेडच्या युतीला ९,८७६ कोटी रुपयांना विकला होता. नुमालीगड रिफायनरीतील भागविक्रीमुळे बीपीसीएलच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा:

ड्रीम्स मॉलची आग पुन्हा भडकली

बांग्लादेशातून आले, केरळचे मतदार झाले

कोणाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या अहवालावर कारवाई केली नाही? – आ.अतुल भातखळकर

परमबीर यांनी दाखल केली उच्च नायायालयात याचिका

पुढील आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये भागभांडवलातून १.७५ लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामध्ये दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि एक सामान्य विमा कंपनीचा समावेश आहे.

Exit mobile version