व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांच्यावर आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती यापूर्वी, या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने बँकेच्या अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला अटक केली आहे.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या वेणुगोपाल धूत यांना घरचे जेवण देण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे.
२३ डिसेंबरला सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केली होती. यानंतर सीबीआयने २६ डिसेंबर रोजी व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनाही अटक केली. या तिघांनाही २९ डिसेंबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
खिलाडी अक्षय कुमारने योगी आदिनाथांना दिले रामसेतु पाहण्याचे निमंत्रण
अजित पवार यांची वैचारिक उंची कळली
श्रीनगरमधील अहमद अहंगर दहशतवादी घोषित
दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत हे आर्थर रोड तुरुंगात तर चंदा कोचर या भायखळा महिला कारागृहात आहेत.
वेणुगोपाल धूत यांचे वकील एस. एस. लड्डा आणि विरल बाबर यांनी दावा केला होता की, त्यानी नेहमी तपास अधिकाऱ्याना सहकार्य केले आहे.
वेणुगोपाल धूत यांनी सीबीआयच्या अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.धूत यांनी न्यायालयीन कोठडीत घरचे जेवण मिळावे यासाठी अर्ज केला होता त्यावर विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर हे प्रकरण काल सुनावणीसाठी आले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने धूत यांची याचिका फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीतील घरच्या जेवणाचा अर्जही रद्द केला आहे.