एफ.ए.ए.च्या मानांकनात मोठे बदल

बोईगच्या नव्या ७३७ मॅक्स विमानाचे अपघात झाल्यानंतर या विमानांचा संपूर्ण ताफा उड्डाणातून रद्द करण्यात आला होता. आता सुमारे २० महिन्यांनंतर अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीने या विमानांच्या उड्डाणांना परवानगी देताना आपल्या नियमात काही बदल केले आहेत.

एफ.ए.ए.च्या मानांकनात मोठे बदल

जगातील अग्रगण्य विमान उत्पादक बोईंगच्या ‘७३७ मॅक्स’ या विमानाचे दोन दुर्दैवी अपघात झाले ज्यात ३४६ प्रवाशांनी प्राण गमावले. त्यानंतर एफ.ए.ए ने या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली. आता एफ.ए.एने या विमानांवरची बंदी उठवतानाच ही संस्था आपले नियम कडक करणार असल्याचं कळलं आहे. 

हे ही वाचा: बोईंगशी एफ.ए.ए.चे साटेलोटे

नुकतंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मान्यता दिल्यामुळे एफ.ए.एचे हात बळकट करणारा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यान्वये विमान उत्पादकांना सुरक्षेशी निगडीत विविध उपाययोजना एफ.ए.एकडे उघड करणे आवश्यक झाले आहे. आम्ही कॉँग्रेसने सुचवलेले बदल नक्कीच अमलात आणू. एफ.ए.ए यापुढेही उड्डाण सुरक्षेसाठी बांधिल आहे असे एफ.ए.एने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

एफ.ए.ए.ने २० महिन्यांच्या अवधीनंतर बोईंग ७३७ मॅक्सवरील बंदी उठवली आहे. अमेरिकन एअरलाईन्स न्यु यॉर्क- मिआमी मार्गावर विमानसेवा सुरू करून या विमानांच्या सेकंड इनिंगचा प्रारंभ करेल. 

बोईंगने या बदलावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Exit mobile version