बोईंगशी एफ.ए.ए.चे साटेलोटे

बोईंगशी एफ.ए.ए.चे साटेलोटे

अमेरीकी सिनेटच्या चौकशी समितीचा ठपका

विमान उड्डाण करताना अचानक बिघाड झाल्यास वैमानिकाचा प्रतिसाद कसा असावा याबाबत चाचण्या घेताना बोईंग कंपनीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा ठपका सिनेटच्या चौकशी समितीने ठेवला आहे. इंडोनिशियात इथोपियन एअर लाईन्सच्या विमानाच्या अपघात झाल्यानंतर बोईंग कंपनीच्या ७३७ मॅक्स विमानांच्या उड्डाणावर बंदी घालून चौकशीसाठी सदर समितीची स्थापना करण्यात आली होती.

अमेरिकन सिनेटच्या वाणिज्य समितीने प्रसिध्द केलेल्या अहवालात, ‘फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन’ (एफएए) वर देखील ताशेरे ओढले असून ऍडमिस्ट्रेशनने कंपनीने केलेल्या गंभीर फेरफाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे या अहवालातून कळते.

हे ही वाचा: एफ.ए.ए.च्या मानांकनात मोठे बदल

गेल्या वर्षी इंडोनेशियात इथिओपियन एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ मॅक्स जातीच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात ३४६ लोक मृत्यू पावले. त्यानंतर बोईंग ७३७मॅक्सच्या सर्व विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली. बोईंगने विमान यंत्रणेत मोठ्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. ज्याला एफएएने मागच्या महिन्यात मंजुरी देऊन, बोईंग ७३७मॅक्स विमानांच्या उड्डाणाला परवानगी दिली आहे.

हा प्रकार दडपण्यासाठी सरकारी वाहतूक विभागाने अडथळे निर्माण केले असल्याचे वाणिज्य समितीच्या अहवालात म्हटले आहे. 

वाहतूक विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एफएएने हे आरोप फेटाळले आहेत. या संदर्भात बोलताना, या अहवालात अनेक निराधार आरोप करण्यात आल्याचे म्हटले आहे. एफएएच्या म्हणण्यासनुसार लायन एअर फ्लाईट ६१० आणि इथिओपिअन एअरलाईन फ्लाईट ३०२ च्या दुर्दैवी अपघातास जबाबदार असलेली सुरक्षा प्रणाली बदलण्यात आली असून, तिची स्वतंत्र चाचणी एफएए आणि तिच्या सहयोगी संस्थामार्फत होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Exit mobile version