आरामदायी गाड्यांच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या जर्मन वाहन उत्पादक बीएमडब्ल्यु कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक गाडी तयार केली आहे. सेडान प्रकारच्या या गाडीला आय४ असे नाव देण्यात आलेली ही गाडी, या वर्षात बाजारात येणार आहे.
बीएमडब्ल्युचे २०२५ पर्यंत २५ इलेक्ट्रिक गाड्या दर्शविण्याचे लक्ष्य होतेच आणि बुधवारी त्यांनी चार दरवाजे असलेल्या गाडीचे प्रारूप तयार केले आहे.
बीएमडीब्ल्यु आय४ ही गाडी विविध स्वरूपांत उपलब्ध होणार आहे. यात ४८२किमी लांबीचा पल्ला असलेली गाडी पण उपलब्ध होऊ शकेल, असे इपीएच्या चाचण्या प्रक्रियांवर आधारित प्राथमिक चाचण्यांतून निष्पन्न होत आहे.
हे ही वाचा:
ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर
दिल्लीत फडणवीस, मोदी, शाह यांची बैठक
पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगणा मध्ये बॉम्बहल्ला, हिंसाचाराचा केवळ ट्रेलर?
या गाडीतील ३९० किलोवॅट/५३० हॉर्सपॉवर असलेली ही गाडी शुन्यापासून १०० किमी प्रतितास एवढ्या वेगापर्यंत केवळ चार सेकंदात जाऊ शकते.
“स्पोर्टी दिसणारी, कोणत्याही प्रकारे एमिशन नसलेली, ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव देऊ शकणारी बीएमडब्ल्यु आय४ ही खरी बीएमडब्ल्यु आहे. हे बीएमडब्ल्यु ब्रँडचे मर्म आहे आणि आता ते इलेक्ट्रिक क्षेत्रातही उतरले आहे.” असे बीएमडब्ल्युच्या संचालक मंडळावरील कस्टमर, ब्रँड आणि सेल्स यासाठी जबाबदार असलेल्या पीटर नोटा यांनी सांगितले आहे.
बीएमडब्ल्युचे वैशिष्ट्य असलेल्या स्पोर्टीनेस, सुखकारकता आणि विश्वसनीय कार्यक्षमता हे या इलेक्ट्रिक वाहनाचे वैशिष्ट्य राहिल असे कंपनीच्या पत्रकात म्हटले आहे.
#TheUltimateElectricDrivingMachine.
The first-ever BMW i4, truly electric.#THEi4 @BMWi #BornElectric pic.twitter.com/gbWJhZ1syA— BMW (@BMW) March 17, 2021
याबाबतचा अधिक तपशील पुढील आठवड्यात उपलब्ध होणार आहे, असे बीएमडब्ल्यु तर्फे सांगण्यात आले आहे.
एलन मस्क यांच्या टेस्लाच्या गाड्यांपेक्षा ४८२किमीचा पल्ला कमी आहे.