दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारने भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्याची घोषणा केल्याने ४ नोव्हेंबरपासून (गुरुवार) पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. उद्यापासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी कमी होणार आहे.
डिझेलवरील उत्पादन शुल्कातील कपात पेट्रोलच्या दुप्पट असेल आणि आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहनही सरकारी सूत्रांनी बुधवारी केले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, अलिकडच्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, जगाने सर्व प्रकारच्या ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत.
देशात ऊर्जेचा तुटवडा भासणार नाही. पेट्रोल आणि डिझेल सारख्या वस्तू आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
अर्थव्यवस्थेला आणखी गती देण्यासाठी, डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात लक्षणीय घट करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपातीमुळे वापराला चालना मिळेल आणि महागाई कमी राहील, त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीयांना मदत होईल, असे वित्त मंत्रालयाने पुढे नमूद केले.
हे ही वाचा:
आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही
शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?
घरोघरी जाऊन लसीकरण करा, मोदींचे राज्यांना आदेश
गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश
बुधवारीही इंधनाचे दर कायम ठेवण्यात आले होते. दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ११०.०४ रुपये आणि ९८.४२ रुपये प्रति लिटर आहेत.