युक्रेन-रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असल्याने शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे, मात्र याउलट सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति तोळा पन्नास हजार रुपयांच्या घरात पोहचला आहे. तर चांदीचा भावही वाढला आहे.
सोन्याच्या दारात ८१९ रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात एक हजार ७१२ रुपयांनी वाढ होत चांदीचा भाव प्रति किलो ६३ हजार ८६९ पोहचला आहे.IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत. तथापि, या वेबसाइटवर दिलेल्या दरामध्ये जीएसटी समाविष्ट नाही. मात्र लोक सोने खरेदी आणि विक्री करताना IBJA दराचा संदर्भ घेऊ शकतात.
IBJA नुसार, १ फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव ४७ हजार ९७६ रुपये प्रति तोळ्यावर बंद झाला, तर आज त्याचा सरासरी दर ४९ हजार ७३९ रुपयांवर पोहोचला आहे. राज्यात आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४२० रुपयांनी तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ४०० रुपयांनी वाढला आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’
भारताने घातली आणखी ५४ चिनी ऍप्सवर बंदी
मुलाच्या हव्यासापोटी गरोदर बायकोला केली मारहाण; नंतर दिला तलाक!
नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले
पुण्याच्या सराफा बाजारात कालच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत तब्बल पन्नास हजार २७० रुपये प्रति तोळा आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६ हजार ८१ रुपये प्रति तोळा आहे. त्याशिवाय राज्यात २४ कॅरेट सोन्याचा दर पन्नास हजार २६० रुपये प्रति तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ८७० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा भाव ६७ हजार ४०० रुपये किलोने विकला जात आहे. आज राजस्थानच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.