अदानी समूहाने आंध्र प्रदेशमध्ये उभारल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपूर्ण ६.४ गिगावॅट करता निविदा भरली आहे. ही भारतातील आत्तापर्यंत सर्वात मोठी निविदा आहे.
आंध्र प्रदेशमध्ये ६.४ गिगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी भरल्या गेलेल्या निविदांमध्ये अदानी समूहाने संपूर्ण ६.४ गिगावॅट करता निविदा भरली आहे. इतर इच्छूकांमध्ये आंध्र प्रदेशमधील श्री साई तर्फे ५.८ गिगावॅट, एन.टी.पी.सी लिमिटेड तर्फे १.८गिगावॅट, टोरंट पॉवर लिमिटेड तर्फे ३०० मेगावॅट आणि एच.इ.एस- एस.एस.आय.एस.पी.एल कडून ६०० मेगावॅट करता निविदा देण्यात आल्या आहेत.
ह्या निविदा गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून सौर विजेच्या भावात करण्यात कपातीच्या पार्श्वभूमीवर आल्या आहेत. भारतातील सौर ऊर्जेचा दर निचांकी ₹१.९९ प्रति युनिट इतका झाला आहे. हा दर अजून पडण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जात आहे.
आंध्र प्रदेश ग्रीन एनर्जी कॉर्पो. लिमिटेड या मुख्य संस्थेतर्फे ही निविदा प्रक्रिया पाहिली जात आहे. प्रकल्पाची एकूण किंमत ₹२५,६०० कोटी असण्याची शक्यता आहे.
एकूण १४.९ गिगावॅट प्रकल्पापैकी ६.४ गिगावॅट करता निविदा मागवण्यात आल्या होत्या असे सुत्रांकडून समजले आहे. यापैकी केवळ अदानी समुहाने संपूर्ण ६.४ गिगावॅट करता निविदा दिली असून, इतर इच्छूकांनी त्यापेक्षा कमी क्षमतेसाठी निविदा भरल्या आहेत.
यासंदर्भात अदानी समूह, टोरंट पॉवर आणि एन.टी.पी.सी लिमीटेड या कंपनीच्या प्रवक्त्यांशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही.
बिझनेस लाईन या वृत्तपत्रात या संदर्भात वृत्त प्रसिध्द झाले आहे.