कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. देशात रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा फटका शेअर बाजार कोसळल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरीकडे ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजनचा उल्लेख आहे, त्यां कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये पैसे लावत आहेत. मात्र, त्या कंपन्यांबाबत वेगळीच गोष्ट समोर आली आहे.
ऑक्सिजन तुटवड्याचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला. ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजन आहे त्यांच्या शेअरचे भाव वधारले आहेत. बॉम्बे ऑक्सिजन कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. कंपनीचा शेअर मार्च महिन्यापर्यंत दहा हजार होतो. यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. बीएसईमध्ये सोमवारी बॉम्बे ऑक्सिजन इन्वेस्टमेंटस लि. चा शेअर २४ हजार ५७४.८५ रुपयांपर्यंत पोहोचला. याकंपनीचे शेअर नियंत्रणात असून त्याच्या लाभाची मर्यादा ५ टक्के पर्यंत असेल.
हे ही वाचा:
निलेश राणेंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजेत
शिंगणेंच्या खुलाशाने नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड
आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज
सहा महिन्यात भारतात बनणार लिथियम-आयन बॅटरी
बॉम्बे ऑक्सिजन कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर त्या कंपनीची स्थापना ३ ऑक्टोबर १९६० झाल्याचा उल्लेख आहे. मात्र, ३ ऑक्टोबरला २०१८ ला कंपनींचं नाव बदलून बॉम्बे इन्वेस्टमेंटस असे ठेवण्यात आलं. कंपनीनं त्यांचं औद्योगिक वापरासाठीच्या गॅसचं उत्पादन २०१९ मध्येचं बंद केलं आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कंपनीच्या वेबसाईटमध्ये विरोधाभास आहे. कंपन आता ऑक्सिजनची निर्मिती करत नाही. ऑक्सिजन आणि औद्योगिक गॅस निर्मितीबाबत उल्लेख दिसतो.