रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहतील (२रा/चौथा शनिवार आणि रविवार वगळता). स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन , जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी यांसह अनेक मोठे सण ऑगस्टमध्ये येत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल, तर तुमची राज्य सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याची याेजना आखा.
सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम
कृपया लक्षात घ्या की या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर देखील अवलंबून असतात.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी
चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात
या तारखांना बंद असतील बँका
१ऑगस्ट: द्रुपका शे-जी उत्सव (फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.)
७ ऑगस्ट: २०२२ – पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
८ ऑगस्ट: मोहरम
९ ऑगस्ट: मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद राहतील.)
११ ऑगस्ट: रक्षा बंधन (देशभरात सुट्टी)
१३ ऑगस्ट: दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
१४ ऑगस्ट:-रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
१६ ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
१८ ऑगस्ट: जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
२१ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२८ ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३१ ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)