थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीतून भारतीय बँकांनी सुमारे १३ हजार १०९ कोटी वसूल केल्याचे अशी माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २० डिसेंबरला लोकसभेत दिली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA) अंतर्गत केंद्रीय एजन्सीने थकबाकीदारांची मालमत्ता जप्त केली होती.
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या फरार व्यक्तींच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ हजार १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत, असे सीतारामन यांनी सांगितले. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ‘अनुदानाच्या पुरवणी मागण्या’ या विषयावरील चर्चेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात देश सोडून पळून गेलेल्या थकबाकीदारांबद्दल सांगितले.
हे ही वाचा:
पेपरफुटी प्रकरणी आणखी एक पोलिसांकडे ‘डेरे’दाखल
एअर ऍम्ब्युलन्समध्ये ओदिशाचा पहिला नंबर
परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित
कट्टरपंथी झाकीर नाईकच्या संघटनेवर भारतात बंदी
अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांनी विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या फरार व्यक्तींच्या मालमत्ता विकून १३ हजार १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत. ईडीकडून सरकारला ही माहिती मिळाली आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, जप्त केलेल्या ताज्या यादीमध्ये फरारी किंगफिशर व्यापारी विजय मल्ल्याची मालमत्ता आहे. १६ जुलै रोजी ही मालमत्ता विकली गेली आणि त्यातून ७९२ कोटी रुपये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. जप्तीनंतर परत मिळालेले पैसे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बँका पूर्वीपेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाल्या आहेत.