आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी शेअर बाजारात बजाज हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सने दमदार एंट्री केली आहे. हा शेअर्स ११४ टक्क्यांच्या प्रीमियमवर लिस्टेड झाला असून यामुळे गुंतवणूक दारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याची इश्यू प्राईज ७० रुपये इतकी होती. त्या तुलनेत तो बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी प्रति शेअर्स १५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे.
२०२४ वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला होता. या आयपीओकडे सर्वांच्या नजरा होत्या. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी प्रति शेअर ६६ ते ७० रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. पण, त्या तुलनेत स्टॉक शेअर बाजारात ११४ टक्के प्रिमियमवर म्हणजेच १५० रुपयांच्या किमतीवर लिस्ट झाला. यामुळे आयपीओमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हची उपकंपनी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ६,५६० कोटी रुपयांचा आहे. हा आयपीओ हा आत्तापर्यंतचा वर्षातील सर्वात मोठा मानला जात आहे.
हे ही वाचा :
हैद्राबादमधील सिकंदराबादमध्ये बाप्पाच्या वेशभूषेवरून वाद
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी
बांगलादेशी, रोहिंग्यांच्या पाठीशी झारखंड मुक्ती मोर्चा
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सच्या तेजीमुळे या कंपनीचे बाजार भांडवल १.०७ लाख कोटींवर पोहोचले आहे. या शेअर्सची किंमत १६०.९२ अशा उच्चांकावर पोहोचली. या आयपीओला गेल्या आठवड्यात एकूण ३.२३ लाख कोटी सबस्क्रिप्शन मिळाले होते. याआधी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओने एलआयसीचा विक्रम मोडला होता. टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ २१ हजार कोटींचा होता. टाटा टेक आयपीओला ६९.४३ पट ओव्हरसबस्क्राइब केले गेले होते.