देशात कोरोना महामारीनंतर उद्योग धंद्याना आलेली मरगळ झटकून देत यंदा सर्वच उद्योग धंदे सणासुदीच्या काळात तेजीत चालत आहेत. त्यातच आता वाहन उद्योगाची भर पडली आहे. सणासुदीच्या काळात वाहन उद्योग पूर्व पदावर येत असल्याचे संकेत दिसत आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये वाहन विक्रीत ११ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती वाहन विक्रेता संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशने मंगळवारी दिली.
टाटा, महिंद्रापेक्षा ‘मारुती’ वाहन कंपनी यावर्षी सुसाट असून सप्टेंबर महिन्यात सुमारे १ लाख ३ हजार वाहनांची विक्री केली आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात मारुती कंपनीने ९९ हजार २७६ वाहनांची विक्री केली होती. ह्युंदाई मोटर्स च्या घाऊक विक्रीत सप्टेंबरमध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची एकूण विक्री ६३,२०१ वाहन विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने केवळ ४५,७१९ वाहनांचा पुरवठा केला. तर दुसरीकडे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की सप्टेंबरमध्ये देशांतर्गत विक्री ४४ टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षी कंपनीच्या वाहनांची एकूण विक्री ८०,६३३ वाहन विक्री झाली आहे. जी गेल्या वर्षी ५५,९८८ वाहन विक्री झाली होती. होंडा, स्कोडा इत्यादी इतर कंपन्यांनी देखील त्यांच्या एकूण विक्रीत वाढ नोंदवली आहे.
हे ही वाचा:
ठाकरेंच्या घराणेशाहीवर शिंदेंचा बाण
रिक्षातून ‘ती’ गोणी घेऊन उतरणाऱ्या तरुणी गावल्या पोलिसांच्या तावडीत
मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८० कोटींचे हेरॉईन जप्त
दसरा आणि दिवाळीसारख्या सणोत्सवामुळे चालू ऑक्टोबरमध्ये वाहन विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची आशा वाहन कंपन्याना आहे. यंदा सेमीकंडक्टरचा वाढलेला पुरवठा, तसेच वाहन निर्माता कंपन्याकडून वाहनांची चांगली उपलब्धता, वाहनांचे सादरीकरण आणि नव-नवीन तंत्रज्ञानामूळे ग्राहकांनी वाहन वितरकांकडे नवीन वाहनाची मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याची माहिती ‘फाडा’चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी दिली.