वाहन उद्योगाला तेजी

वाहन उद्योगाला तेजी

वाहन उद्योगाला आलेली मरगळ झटकली गेल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी पगार कपातीचा निर्णय परत फिरवला आहे. त्याउलट मागणीत झालेल्या अनपेक्षित वाढीमुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांनी पाठ थोपटायला सुरूवात केली आहे.

अनेक वाहन उद्योग कंपन्यांतील उच्चपदस्थांनी आर्थिक वर्ष २१च्या सुरूवातीस पगारातील ऐच्छिक कपात स्वीकारली होती. कोविड-१९च्या महामारीमुळे बाजारपेठेत आलेल्या जबरदस्त मंदीचा फटका बसला होता. एप्रिल-जून या तिमाहीत वाहन उद्योगातील विक्री सुमारे ७५ टक्क्यांनी कोसळली होती.

मात्र जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ही मागणी अनपेक्षितपणे झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन बक्षिस द्यायला सुरूवात केली आहे. कोविड-१९ मुळे एका तिमाहीचे नुकसान झाले असले तरी काही कंपन्यांना त्यांच्या वार्षिक पगारवाढ चक्रालाच धरून राहण्याचे निश्चित केले आहे. तर दुसरीकडे काही कंपन्यांनी येऊ घातलेल्या आर्थिक वर्षाच्या आधीच आणखी एकदा पगारवाढ करायला सुरूवात देखील केली आहे.

भारतातील वाहन उद्योगातील नामवंत कंपन्यांना देखील कोविड-१९ मुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका बसला होता. ह्युंदाई ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीत कोणत्याही प्रकारे पगारात कपात करण्यात आली नव्हती.

ह्युंदाई पाठोपाठ बजाज ऑटो, जे के टायर, सिएट या कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांसाठी आपला बटवा उघडला आहे. पगारवाढी सोबतच कोविड-१९ मुळे थकलेल्या बढत्या देखील करायला सुरूवात केली आहे.

Exit mobile version