जगप्रसिद्ध जर्मन अलिशान वाहन उत्पादक कंपनी ऑडी भारतातील त्यांच्या सर्वच क्षेत्रातील विक्री वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या आर्थिक वर्षात वाढीचा वेग दोन अंकी करू इच्छिते, त्यासाठीच ही योजना निश्चित केली आहे. सध्याच्या काळात अलिशान वाहनांच्या विक्रीत ४० टक्क्यांची घट झाली आहे. अशा प्रतिकुल काळात कंपनी वाढीचा वेग दोन अंकी राखू इच्छित आहे.
सध्याच्या काळात ऑडीची केवळ दोनच उत्पादने स्थानिक पातळीवर निर्माण केली जातात. येत्या वर्षात कंपनी अजून नवी उत्पादने भारतीय बाजारपेठेत उतरवणार आहे. ऑडीने नुकत्याच बाजारात आणलेल्या ऑडी ए४ सेडानची किंमत भारतात ₹४२,३४,००० आहे.
कंपनीच्या उच्चपदस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नवी उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत. त्यामुळे आम्हाला नक्कीच मोठीच मदत होणार आहे. अर्थमंत्र्यांनी सध्याच्या काळात केलेल्या विधानांमुळे यंदाचा अर्थसंकल्प अभूतपूर्व असेल असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कंपनी येत्या काळात त्यांच्या उपलब्ध विविध क्षेत्रात नव्या उत्पादनांसह उतरत आहे. मात्र त्याचवेळेस कंपनी किंमतीकडे देखील लक्ष देणार आहे. कमीत कमी खर्चात आपले स्त्रोत जास्तीत जास्त वापर करून घेण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे.