अदानी-रिलायन्सपैकी कोण जिंकणार 5G स्पेक्ट्रमची बोली

अदानी-रिलायन्सपैकी कोण जिंकणार 5G स्पेक्ट्रमची बोली

देशातील 5G ​​स्पेक्ट्रमची ऑनलाइन लिलाव प्रक्रिया आज, २६ जुलैपासून सुरू झाली आहे. या लिलाव प्रक्रियेत रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी यांच्यासह चार कंपन्या सहभागी होणार आहेत. यादरम्यान, ४.३ लाख कोटी रुपयांच्या ७२ GHz स्पेक्ट्रमसाठी बोली लावली जाणार आहे. आज सकाळी १० वाजता निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

लिलाव प्रक्रिया दोन दिवस सुरु राहू शकते. 5G स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशात 5G सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. देशात प्रथमच होणाऱ्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून दूरसंचार विभागाला ७० हजार कोटी ते १ लाख कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर या वर्षाच्या अखेरीस देशात 5G सेवा सुरू होऊ शकते. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, 5G सेवा देशातील सध्याच्या 4G सेवांपेक्षा दहापट जलद असेल. 5G सेवेच्या व्यावसायिक प्रक्षेपणानंतर, देशातील इंटरनेट वापराचा अनुभव मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात, 5G सेवा सुरू झाल्याने एक नवीन क्रांती अपेक्षित आहे

हे ही वाचा:

तेजस्वी सूर्याने केला मोदींचा लाल चौकातील ‘तो’ फोटो शेअर

सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला

विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत

मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान

5G स्पेक्ट्रमच्या लिलावादरम्यान रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्यात स्पर्धा होऊ शकते. दोन्ही कंपन्यांनी दावा केला आहे की 5G सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यात ते अग्रेसर असतील. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावापूर्वी, रिलायन्स जिओने लिलाव प्रक्रियेअंतर्गत दूरसंचार विभागाकडे १४ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. त्याच वेळी, अदानी एंटरप्रायझेसने १०० कोटी रुपये जमा केले आहेत. आज 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील संचार भवनात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version