सध्या सगळीकडे चॅटजीपीटीची चर्चा आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रसिद्ध कंपन्या सध्या एआय चॅटबॉट्सच्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. चाटजीपीटी क्षेत्रात सध्या तरी याच दोन कंपन्यांचा बोलबाला आहे. कारण युजर्ससाठी या कंपन्यांनी प्रीमियम आणि विनामूल्य दोन्ही आवृत्त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. गुगल आणि मायक्रोसॉफ्टची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आता भारत सरकार सज्ज होत आहे.
केंद्र सरकार लवकरच भारतीय बनावटीचे चॅटजीपीटी आणण्याच्या तयारीत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय बनावटीच्या चॅटजीपीटीची निर्मिती करण्याचे संकेत दिले आहेत. काही आठवडे थांबा, एक मोठी घोषणा होईल असे वैष्णव यांनी म्हटले आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्येही नसतील अशी अनेक अनोखी वैशिष्ट्ये या भारतीय चॅटबॉटमध्ये असतील असे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे सर्व युजर्स त्याचा पूर्णपणे विनामूल्य वापर करू शकतील. लवकरच आपल्या देशात स्वतःचे एआय चॅटबॉट असेल. युजर्स चॅट जीपीटी प्रमाणे त्याचा वापर करू शकतील अशी घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय चॅटजीपीटी संदर्भात केली आहे. यामुळे गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना धक्का बसणार आहे. भारतीय चॅट जीपीटी सुरू करण्यासाठी सध्या नियोजन करण्यात येत आहे त्यामुळे युजर्सना त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
सध्या, भारतीय बाजारपेठेत गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या केवळ दोनच कंपन्या चॅटजीपीटी साठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. चॅट जीपीटी सुरू झाल्यापासून केंद्र सरकार या क्षेत्रातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. भारतीय चॅटजीपीटी सुरु झाल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा बघायला मिळणार असून त्याचा फायदा फायदा युजर्सना होणार आहे.
हे ही वाचा:
मी आता डॉक्टर झालेलो नाही याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलीत
भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील ३० दिवस होणार १५ % पाणीकपात
हुश्श…आता ३० जूनपर्यंत करा पॅन आधारशी लिंक
चॅटजीपीटी म्हणजे काय?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित टूल ‘चॅटजीपीटी’ जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. विचारलेल्या प्रश्नांची तपशीलवार आणि अचूक उत्तरे देण्यास सक्षम असल्यामुळे हे एआय टूल सर्व तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी अतिशय खास साधन म्हणून उदयास आले आहे. चॅटजीपीटी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोस्थित ओपन एआय या आर्टिफिशिअल इंटीलिजन्स कंपनीने विकसित केले आहे. लॉन्च झाल्यापासून फार कमी वेळात ते वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे.