असोसिएशन फॉर स्पोर्ट्स, कल्चर, एन्टरटेनमेंट, एज्युकेशन, इंडस्ट्री, मार्केट आणि ऍग्रिकल्चर अर्थात असिमा यांनी भारतीय जनता पार्टीच्या उद्योग शाखेच्या सहकार्याने एप्रिल महिन्यात लघू, मध्यम, सूक्ष्म (एमएसएमई) उद्योग परिषदेचे आयोजन केले आहे.
चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या सभागृहात ही परिषद भरणार असून २४ एप्रिलला सकाळी १० ते १ या वेळेत ही परिषद होईल. या परिषदेला या उद्योगक्षेत्रातील २५० आघाडीचे उद्योगपती सहभागी होणार आहेत. फिक्की, एमएसीसीआयए, आयएमसी, मास्मा, सीएमएआय, एजेएमए, फॅम, फार्मा इंडस्ट्री यांनाही या परिषदेसाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.
भाजपाच्या उद्योग शाखेचे महासचिव निरंजन प्रभूदेसाई यांनी ही माहिती दिली असून 7304646686 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.