महानंद दुधाचा पुरवठा लष्कर का करणार बंद?

आवश्यक तो पुरवठा होत नसल्याची तक्रार

महानंद दुधाचा पुरवठा लष्कर का करणार बंद?

लष्कराला दूध पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित अर्थात महानंद डेरीचे उत्तम दुधाची गुणवत्ता, चांगल्या दर्जाचे पॅकिंग, शुद्ध दूध यामुळे महानंद डेरी लष्कराला दरवर्षी ३० ते ४० लाख लीटर दूध पुरवठा करते. मात्र काही कारणांमुळे महानंदा डेरी दूध पुरवठा करण्यात कमी पडत असल्याने, लष्कराला दूध पुरवठ्याच्या स्पर्धेतून कायमस्वरूपी बाद होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

संरक्षण विभागाने देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना सकस दूध उपलब्ध व्हावे म्हणून नॅशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेडरेशनच्या माध्यमातून महानंद डेअरीकडून ‘टेट्रापॅक’ स्वरूपात दूध खरेदी करते. अशाच प्रकारे लष्कर दरवर्षी लाखों लीटर दूध मागवते. यंदा लष्कराच्या नॉर्दन कमांडने १ ऑक्टोबरपासून दूध खरेदीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महानंद दूध डेअरीला १९ लाख लीटर दूध पुरवण्याचे टेंडर देण्यात आले होते.

हे ही वाचा:

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८० कोटींचे हेरॉईन जप्त

झेल सुटले आणि सामनाही निसटला

रिक्षातून ‘ती’ गोणी घेऊन उतरणाऱ्या तरुणी गावल्या पोलिसांच्या तावडीत

तर ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होऊ देणार नाही

 

मात्र टेंडर देऊन सुद्धा महानंद दूध वर्षभरासाठी पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्याचे कारण देत लष्कराला दूध नाकारले आहे. करारानुसार आता १ ऑक्टोबर पासून १९ लाख ४५ हजार लीटर दूध देणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता लष्कराच्या जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग, बारामुल्ला भाग, बंदीपुरा, अवंतिपूरा, डावर आणि खानाबल या लष्कराच्या भागाला दूध पुरवठा होणार नसल्याचे महानंद डेअरीने सांगितलं आहे.

Exit mobile version