भारतातून गव्हाची दुप्पट निर्यात

भारतातून गव्हाची दुप्पट निर्यात

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत भारताने दुप्पट गव्हाची निर्यात केली, आहे. सरकारने मे महिन्याच्या मध्यात अचानक बंदी नंतर निर्यात मंदावली असतानाही त्यात वाढ झाली आहे वाणिज्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत ४३. ५० लाख मेट्रिक टन गव्हाची निर्यात केली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यांपेक्षा ११६.७ टक्के जास्त होती.

फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर निर्यातीला चालना मिळाली. त्यामुळे भारतीय गव्हाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे . एप्रिलमध्ये निर्यात १४.७१ लाख मेट्रिक टनावर पोहोचली. गेल्या वर्षात एप्रिलमध्ये झालेल्या २.४२ लाख मेट्रिक टन निर्यातीपेक्षा ती ५०० टक्के जास्त आहे. १३ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या बंदीनंतर, त्या महिन्यातील निर्यात १०.७९ लाख मेट्रिक टनावर घसरली होती.मे २०२१ मध्ये निर्यात झालेल्या ४. ०८ लाख मेट्रिक टन पेक्षा अजूनही १६४ टक्क्यांनी जास्त होती. भारताने एप्रिलमध्ये ४४ देशांना गहू निर्यात केला आहे. सर्वाधिक ३.३५ लाख मेट्रिक टन बांगलादेशला आणि ब्रिटनला सर्वात कमी २,००० मेट्रिक टन निर्यात झाली. निर्यातीमध्ये इंडोनेशिया, बांगलादेश, कोरिया, यूएई आणि अंगोला या देशांचा समावेश आहे.

हे ही वाचा

भाजपाची माघार, ऋतुजा लटके बिनविरोध

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत आटा (गहू किंवा मेस्लिन पीठ) निर्यातही दुपटीने वाढली आहे – एप्रिल-ऑगस्ट २०२१ च्या १.६४ लाख मेट्रिक टन तुलनेत ४.४९ लाख मेट्रिक टन निर्यात झाली. सोमालिया, यूएई, श्रीलंका, मादागास्कर आणि जिबूती हे देश आता खरेदीमध्ये आघाडीवर आहेत.

Exit mobile version