सतत नवे विक्रम करत चर्चेत असलेल्या रिलायन्सने आता अजून एक विक्रम करत नाव कमावलं आहे. अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये रिलायन्सची गुंतवणूक आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनी सातत्याने चर्चेत असते. आतादेखील आणखी एका कारणामुळे रिलायन्स कंपनी प्रकाशझोतात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रिलायन्सने एप्रिल महिन्यापासून आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली. मिशन व्हॅक्सीन सुरक्षा या अभियानातंर्गत आतापर्यंत रिलायन्सच्या १० लाख कर्मचाऱ्यांना कोरोना लस मिळाली आहे. ९८ टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाचा किमान एक डोस घेतला आहे. यामध्ये रिलायन्स कंपनी, भागीदार सदस्य, त्यांचे कुटुंबीय, कंत्राटी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
याशिवाय, रिलायन्स केअरच्या ‘वी केअर’ अभियानातंर्गत १० लाख सामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नीता अंबानी यांनी आमची कंपनी सामान्य लोकांच्या लसीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास १० हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात २९ हजार ६८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तब्बल १३२ दिवसांनी नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ३० हजारांच्या खाली गेला आहे. त्यासोबतच ऍक्टिव्ह केसेसही चार लाखांच्या खाली आल्या आहेत. कालच्या दिवसात ४१५ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
हे ही वाचा:
राज्यपाल कोश्यारी आज पूरग्रस्तांना भेटणार
लोकहित जोपासण्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही
पुन्हा एकदा मोदी हटाओचे अपयशी प्रयत्न सुरु
आसाम-मिझोराम सीमासंघर्षाला हिंसक वळण
गेल्या २४ तासात भारतात २९ हजार ६८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४१५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ४२ हजार ३६३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.