राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४- २५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. लवकरच निवडणुका लागणार असल्याने हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्याचा असणार आहे. पुढील चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महिला सक्षमीकारणासाठी महायुती सरकारने काही विशेष घोषणा केल्या आहेत.
अंतरिम अर्थसंकल्पात महिला आणि बालकल्याण विभागाला ३१०७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींना १८ वर्षांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपये निधी देण्यात येणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्याने एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतील, अशी तरतूद करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेची माहिती दिल्यानंतर अजित पवारांनी सभागृहात महिलांची ताकद दर्शवणारी शेरो शायरी केली. “बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आँधी उठती तो दिनरात बदल देती है, जब गरजती है नारीशक्ती, तो इतिहास बदल देती है,” या शायरीतून पवारांनी नारीशक्तीचा गौरव केला.
महिलांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे. महिला सक्षमीकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. दहा मोठ्या शहरांतील किमान पाच हजार महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित असल्याची घोषणा पवारांनी यावेळी केली.
हे ही वाचा:
ब्रिटनस्थित गुंडाने केली नफेसिंग राठींची हत्या?
जरांगेंचा बोलविता धनी कोण? लवकरच षडयंत्र बाहेर काढणार
“जरांगेंची भाषा ही कार्यकर्त्याची नसून राजकीय पक्षाची भाषा”
शरीर कमावण्यासाठी तरुणाने चक्क गिळली नाणी, लोहचुंबक!
याशिवाय अंगणवाडी सेविकांची १४ लाख पदे भरण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. याशिवाय माहिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी महिलांना रोजगाराच्या नव नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पाच हजार पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.