अमूल लवकरच करणार विस्तार

दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या अमूलचा विस्तार करण्याचे त्यांच्या जाहिरातदार गुजरात सहकारी दूध वितरण संघाने (जी.सी.एम.एम.एफ) ठरविले आहे. त्यासाठी जी.सी.एम.एम.एफने १,२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे. 

जी.सी.एम.एम.एफ गुजरातमध्ये सहकारी दूध उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. गुजरातसोबतच आता आंध्र प्रदेश आणि कोलकाता येथे उत्पादन सुरू करण्याचा जी.सी.एम.एम.एफचा मानस आहे. 

हे ही वाचा:विदेशातही अटर्ली, बटर्ली डीलिशस अमुलचा झेंडा

या एकूण गुंतवणूकीपैकी २५० कोटी कोलकाता येथे १० लक्ष लिटर प्रतिदिन या क्षमतेचा कारखाना स्थापन करण्यासाठी वापरले जाणार आहेत. सुमारे ४५०-५०० कोटींची गुंतवणूक राजकोट येथील दूग्ध प्रक्रिया केंद्रासाठी केली जाणार आहे. 

कंपनीच्या धुरीणांनी स्पष्ट केल्याप्रमाणे कोविड महामारीच्या काळात देखील दुग्धउत्पादनात वाढ नोंदली गेली आहे. इतर क्षेत्रांत ३० टक्क्यांची घट नोंदवली गेली असतानाही दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी होती.

Exit mobile version