रक्तदाब नियंत्रित करणारी अमेरिकी लाल द्राक्षे आली बाजारात!

रक्तदाब नियंत्रित करणारी अमेरिकी लाल द्राक्षे आली बाजारात!

नाशिकच्या काळ्या आणि हिरव्या द्राक्षांचा हंगाम संपला असला तरी गणेशोत्सवाच्या तोंडावर लाल द्राक्षांना मागणी वाढली आहे. ही लाल टपोरी द्राक्षे अमेरिकेतली असून सध्या बाजारात या द्राक्षांना मोठी मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून वाशी येथील घाऊक फळबाजारात या द्राक्षांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात ही द्राक्षे २०० ते ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. बाजारात या द्राक्षांना अमेरिकेची द्राक्षे म्हणून ओळख आहे.

अमेरिकेची द्राक्षे अशी ओळख असलेली ही द्राक्षे रेड ग्लोब जातींची आहेत. ही द्राक्षे नेहमीच्या द्राक्षांच्या जातीपेक्षा आकाराने मोठी आणि रसरशीत असतात. या द्राक्षांचा रसही मधुर असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या द्राक्षांना मुंबई आणि ठाण्यातील बाजारांमध्ये चांगली मागणी असते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून या द्राक्षांची वाशी येथील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. सध्या काही ठराविक व्यापारी १० ते २५ किलो वजनाच्या ५० ते ६० पेट्यांची आवक करत असून अडीच हजार रुपयांपासून पेट्यांची विक्री केली जात आहे. किरकोळ बाजारात द्राक्षांच्या प्रतीनुसार द्राक्षांची विक्री केली जाते.

हे ही वाचा:

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार

चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

परदेशातून येणाऱ्या लाल द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही द्राक्षे चांगली असल्यामुळे याचा रस करून पिण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. त्यामुळे शहरी भागातील सधन वर्गाकडून या द्राक्षांची चांगली खरेदी केली जाते, असे फळ व्यापारी नितीन चासकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘रेड ग्लोब’ ही द्राक्षे रक्तदाब नियंत्रणासाठी, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी तसेच त्वचेसाठी उपयुक्त मानली जातात. सौंदर्यप्रसाधनांमध्येही या द्राक्षांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Exit mobile version