27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरअर्थजगतअमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश

अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश

संयुक्त अरब अमिराती ,सौदी, सिंगापूर अव्वल ५ व्यापारी भागीदार देशांमध्ये समावेश

Google News Follow

Related

अमेरिका हा आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांमध्ये मजबूत झाले असतानांच दोन्ही देशांमधील व्यापारात वाढ झाली आहे . वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार २०२१-२२ मधील ११९. ५ अब्ज डॉलरवरून २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७.६५ टक्क्यांनी वाढून १२८. ५५ अब्ज डॉलरवर गेला आहे. २०२०-२१ वर्षात हा व्यापार केवळ ८०. ५१ अब्ज डॉलर इतका होता.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार२०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २. ८१ टक्क्यांनी वाढून ७८.३१ अब्ज डॉलरवर गेली आहे. २०२१-२२ मध्ये ही निर्यात ७६. ८ अब्ज डॉलर इतकी होती. त्याच वेळी, आयात १६ टक्क्यांनी वाढून ५०.२४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.२०२२-२३ मध्ये भारताचा अमेरिकेसोबतचा अतिरिक्त व्यापार २८ अब्ज डॉलर इतका झाला होता.

२०१३-१४ ते २०१७-१८ आणि २०२०-२१ मध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. चीनपूर्वी भारताच्या व्यापार भागीदारांच्या यादीत संयुक्त अजब अमिरातीचे नाव अग्रस्थानी होते.संयुक्त अरब अमिराती ,सौदी आणि सिंगापूर यांचा अव्वल ५ व्यापारी भागीदारांमध्ये समावेश आहे.२०२२-२३ मध्ये संयुक्त अरब अमिराती ७६.१६ अब्ज डॉलरसह तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता तर सौदी अरेबिया ५२. ७२ अब्ज डॉलरसह चौथ्या आणि सिंगापूर ३५.५५ अब्ज डॉलर्ससह पाचव्या क्रमांकावर होता.

हे ही वाचा:

देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट

राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी

काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची

शरद पवार आता नेमकं काय करतील?

चीनसोबतचा व्यापार घटला
भारत आणि चीनमधील व्यपारामध्ये मात्र २०२२-२३ मध्ये घट झाली आहे.या व्यापारात १. ५ टक्क्यांनी घसरण होऊन ती ११३. ८३ अब्ज डॉलरवर आली आहे. २०२१-२२ मध्ये हा व्यापार ११५. अब्ज डॉलरचा झाला होता. २०२१-२२ च्या तुलनेत२०२२-२३ मध्ये भारताची चीनला होणारी निर्यात २८ टक्क्यांनी घसरून १५. अब्ज डॉलर झाली आहे आयात ४.१६ टक्क्यांनी वाढून ९८. ५१ अब्ज डॉलर झाली आहे. भारताची चीनसोबतची व्यापार तूट २०२१-२२ मध्ये ७२अब्ज डॉलरवरून २०२२-२३मध्ये ८३. २ अब्ज डॉलरवर गेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा