अॅमेझॉन कंपनीने क्लाउड सर्व्हिसेसमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. त्यानुसार, क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या अॅमेझॉन वेब सर्व्हिसेजने १,०५,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीमुळे येत्या आठ वर्षांमध्ये भारतात दरवर्षी १,३१,७०० नोकऱ्यांची संधी, मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यात प्रामुख्याने इंजिनिअरींग, मॅन्युफॅक्चरींग, दूरसंचार क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
अॅमेझॉन कंपनी २०१६ ते २०२२ या सहा वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. आतापर्यंत ३.७ अब्ज डॉलर (३०,९०० कोटी) रुपयांची गुंतवणक अॅमेझॉनने केलेली आहे. आता लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मोठी आर्थिक उलाढाल अॅमेझॉन भारतात करत आहे.
या नव्या गुंतवणुकीसह अमेझॉन कंपनीची भारतातील गुंतवणूक ही १,३६,५०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अॅ०मेझॉनचे भारतात दोन डाटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. पहिल्याच वर्षी २०१६ मध्ये मुंबईत एक, तर दुसरे डाटा सेंटर नोव्हेंबर २०२२ मध्ये हैदराबाद येथे सुरू करण्यात आले.
हेही वाचा :
देशातील हावडा-पुरी ही १७ वी वंदे भारत एक्सप्रेस
तापमान; दर पाच वर्षांनी विक्रमी उष्णतेच्या लाटा !
तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा !
तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा !
एडब्ल्यूएसचे सीईओ अॅडम सेलिपस्की म्हणाले, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आम्ही २०१६ पासून केलेली ही भरभराट पाहून प्रेरीत झालो आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत जगात उज्ज्वल स्थान प्राप्त करुन आहे. भारतात व्यवसाय आणि उद्योगांद्वारे गुंतवणूक करण्यास लक्षणीय वाव आहे.