अॅमेझॉनने मंगळवारी जाहीर केले की या वर्षाअखेरीस ते भारतात पहिली मॅन्युफॅक्चरिंग लाइन सुरू करणार आहेत. हे युनिट चेन्नई, तामिळनाडूमध्ये स्थापित केले जाईल आणि दरवर्षी लाखो अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक उपकरणांची निर्मिती केली जाईल. १ कोटी लघु व मध्यम उद्योगांचे डिजिटायझेशन करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अॅमेझॉन करणार आहे भारतात बनलेली उपकरणे जगभरात जगभरात विकून १० अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यास पाऊले मदत होईल. यातून २०२५ पर्यंत १० लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. अॅमेझॉनच्या या गुंतवणुकीतून अॅमेझॉनची भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनांबद्दलची कटिबद्धता दिसते, असे अॅमेझॉनने सांगितले.
फॉक्सकॉनची सहाय्यक कंपनी क्लाउड नेटवर्क टेक्नॉलॉजी या कंपनीबरोबर वर्षाच्या अखेरीस चेन्नईमध्ये उत्पादन सुरु करेल. भारतातील इतर विविध शहरांमधील मागणी आणि उत्पादनासाठीचे पोषक वातावरण याचा अभ्यास करून इतरही अनेक शहरांमध्ये उत्पादन सुरु करणार असल्याचे अॅमेझॉनने सांगितले आहे.
अॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अगरवाल आणि भारताचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अॅमेझॉनने ही घोषणा केली. अॅमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे भारतातील लघु आणि माध्यम उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात बाळ मिळणार आहे.