अमेझॉनवर भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप

अमेझॉनवर भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप

२०२० च्या आर्थिक वर्षात ॲमेझॉन चा तोटा वाढून ७८९९ कोटी रुपयांचे झाले. ॲमेझॉन च्या इंटरनेट सुविधांना जगभरात वीस लाख कोटींचा तोटा एका वर्षांत.

खाद्यपदार्थांसह काही उत्पादनांवर भारतीय राष्ट्रध्वजाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे ऍमेझॉन अडचणीत सापडले आहे.  सोशल मीडियावर त्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तिरंग्याचा अशाप्रकारे वापर करणे हा देशाच्या ध्वजसंहितेचा अपमान आणि उल्लंघन आहे, असा काही आरोप ऍमेझॉनवर करण्यात येत आहे. यासंदर्भात ऍमेझॉनवर कारवाईची मागणी केली जात आहे.

ऍमेझॉनच्या वेबसाइटवर पोशाख, कप, कीचेन आणि चॉकलेट यांसारख्या उत्पादनांवर भारतीय तिरंग्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याविरोधात सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर म्हटले जात आहे की, उत्पादनांवर तिरंगा वापरणे हे भारतीय ध्वज संहिता, २००२ च्या विरोधात आहे. तसेच,असा वापर हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. त्यामुळे या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या संदर्भात अभिप्राय मागणाऱ्या ईमेल प्रश्नांना अमेझॉनने प्रतिसाद दिला नाही.

संहितेनुसार, ‘ध्वज कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा किंवा गणवेशाचा भाग म्हणून वापरता येणार नाही.त्याशिवाय उशा, रुमाल किंवा बॉक्सवर छापले जाऊ शकत नाही.

हे ही वाचा:

मंत्रालय येथील पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडली

वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली, धन्यवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी! वाचा सविस्तर…

 

अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करणे ही ऍमेझॉनची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१७ मध्ये अमेझॉनने कॅनेडियन वेबसाइटवर सूचीबद्ध केलेले भारतीय ध्वज ‘डोरमॅट्स’ हे भारताच्या तीव्र निषेधानंतर काढून टाकावे लागले होते.

दुसऱ्या प्रकरणात, व्यापार्‍यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) अमेझॉन विरुद्ध भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार केली आहे. यामध्ये भारतातील किरकोळ स्टोअर्स घेण्यास मान्यता मिळवण्याच्या प्रकरणात अमेझॉनवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Exit mobile version