ऍमॅझॉनने लोगो बदलला

ऍमॅझॉनने लोगो बदलला

इ-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ऍमॅझॉनने त्यांच्या आयओएस आणि ऍंड्रॉईड ऍपचा लोगो बदलला आहे.

सुमारे महिनाभरापूर्वी ऍमॅझॉन या कंपनीने त्यांच्या मोबाईल ऍपचा लोगो बदलला होता. शॉपींग ट्रॉली ऐवजी तपकिरी पार्श्वभूमीवर निळी पट्टी आणि हसरा चेहरा ठेवण्यात आला होता. त्यामुळे एकंदरीत खरेदीच्या कागदी पिशवीसारखा हा लोगो दिसत होता.

हे ही वाचा:

“‘या’ नेत्यांना भाजपात सामील व्हायचे आहे”- अधीर रंजन चौधरी

मात्र त्यातील निळ्या पट्टीने समाजमाध्यमांवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या कागदी पिशवीवर लावलेल्या निळ्या पट्टीचा आकार बराचसा जर्मनीचा कुप्रसिद्ध हुकूमशहा ऍडोल्फ हिटलर याच्या मिशांसारखा होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्या पट्टीचा आकार बदलण्यात आला, आणि नव्या आकाराची निळी पट्टी त्या पिशवीवर लावण्यात आली. नव्या आकाराची पट्टी कुठल्याही प्रकारच्या मिशांसारखी दिसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

माशॅबल या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऍमॅझॉन या कंपनीने अधिकृतरित्या हिटलरच्या मिशांशी असणाऱ्या साधर्म्यामुळे हा बदल केल्याचे मान्य करण्याची शक्यता नाही.

द व्हर्ज या संकेतस्थळाला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नव्या लोगोतील बदल, ज्याप्रमाणे आपल्या दारात ऍमॅझॉनच्या खोक्यांना पाहून जसा आनंद निर्माण होतो तसाच उत्साह, उत्सुकता आणि आनंद निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे.

Exit mobile version