२३ मे रोजी सर्व ऑनलाईन व्यवहार बंद?

२३ मे रोजी सर्व ऑनलाईन व्यवहार बंद?

जर तुम्ही २३ मे रोजी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणार असाल तर एकदा ही बातमी नक्की वाचा. भारतीय रिझर्व्ह बँकने एनईएफटी बाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आरबीआयनं दिलेल्या सुचनेनुसार, एनईएफटीची सेवा २३ मे २०२१ रोजी रात्री १२ वाजून एक मिनिटांपासून दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. आरबीआयचं म्हणणं आहे की, एनईएफटीची प्रोसेस आणखी सुलभ करण्याच्या उद्देशानं एका दिवसासाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँकेनं एक पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली. त्याचसोबत यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. आरबीआयने म्हटलं की, एनईएफटी सर्व्हिसची सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केलं जात आहे. हे अपग्रेडेशन २२ मे २०२१ रोजीचं काम बंद झाल्यानंतर केलं जाईल. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत एनईएफटी सर्व्हिस उपलब्ध नसणार आहे.

आरबीआयने असेही म्हटले आहे की सदस्य बँका रविवारी एनईएफटी सेवेमध्ये उद्भवलेल्या अडथळ्यानुसार त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या पेमेंट योजना बनविण्यास सांगू शकतात. एनईएफटी सदस्यांना एनईएफटी सिस्टमद्वारे अपडेट्स प्राप्त होतील. यावेळी आरटीजीएस सेवेवर परिणाम होणार नाही असेही केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

हे ही वाचा:

स्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?

कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन

प्रताप सरनाईकांच्या रिसॉर्टवर इडी आणि सीबीआयचे छापे

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

दरम्यान, केंद्रीय बँक आरबीआयने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या आर्थिक धोरणात हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे नॉन-बँक पेमेंट संस्थांसाठी संचालित केंद्रीय भरणा प्रणाली आरटीजीएस आणि एनईएफटीच्या सदस्यत्वासाठी परवानगी दिली आहे. आरबीआयच्या या प्रस्तावामुळे पीपीआय, कार्ड नेटवर्क, वाइड लेव्हल एटीएम ऑपरेटर यांसारख्या नॉन-बँक पेमेंट सिस्टम देखील मध्यवर्ती बँकेद्वारे संचालित आरटीजीएस आणि एनईएफटीचं सदस्यत्व घेऊ शकतील.

Exit mobile version