एकाच महिन्यात एयरटेलचे नुकसान तर जिओचा फायदा?

एकाच महिन्यात एयरटेलचे नुकसान तर जिओचा फायदा?

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मोबाईल सर्व्हिस कंपन्यांनाही बसला असल्याचं स्पष्ट झालं आहे. मे महिन्यात मोबाईल कंपन्यांचे ६२.७ लाख ग्राहक कमी झाले असून त्याचा सर्वाधिक फटका भारती एयरटेलला बसला आहे. भारती एयरटेलच्या ग्राहकांची संख्या तब्बल ४६.१३ लाखांनी कमी झाली आहे तर रिलायन्स जियोला या काळात मोठा फायदा झाला असून त्यांच्या ग्राहकांमध्ये ३५.५४ लाखांची भर पडली आहे. टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे.

रिलायन्स जियोच्या ग्राहकांच्या संख्येत ३५.५४ लाखांची वाढ होऊन ती आता ४३.१२ कोटींवर पोहोचली आहे. मे महिन्यात एयरटेल आणि व्होडाफोन-आयडीया कंपन्याना मोठा तोटा झाला आहे. एयरटेलच्या ग्राहकांमध्ये तब्बल ४६.१३ लाखांची कमी आली आहे. भारती एयरटेलच्या ग्राहकांची एकूण संख्या आता ३४.८ कोटींवर पोहोचली आहे.

व्होडाफोन-आयडीया या कंपनीच्या ग्राहकांची संख्या ४२.८ लाखांनी कमी झाली आहे. त्यामुळे या कंपनीच्या ग्राहकांची एकूण संख्या ही २७.७ कोटी इतकी झाली आहे. भारतात एकूण मोबाईल फोन सर्व्हिस ग्राहकांची संख्या ही ११७.६ कोटी इतकी आहे.

हे ही वाचा:

तालिबानला विनोदाचेही वावडे?

शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

‘तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री’…कोकणवासी कडाडले

भारती एयरटेलच्या वापरकर्त्यांच्या संख्येत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४३.७ लाखांची वाढ झाली होती. त्यानंतर रिलायन्स जियोचा नंबर लागत असून नोव्हेंबर महिन्यात १९.३६ लाख वापरकर्त्यांची वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक फटका व्होडाफोन-आयडीया या कंपनीला बसला होता. एकाच महिन्यात २८.९ लाख ग्राहकांनी या कंपनीला रामराम करुन इतर कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलं होतं. आताही या कंपनीच्या ग्राहकांची संख्या ४२.८ लाखांनी कमी झाली आहे.

Exit mobile version