भारत आणि गयाना या दोन्ही देशांमधील विमानसेवेचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने उभय देशांमधील हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये आवश्यक दस्तऐवजांची देवाणघेवाण झाल्यानंतर हा करार पूर्णतः लागू होईल.
गयानाबरोबर हवाई सेवा करारावर स्वाक्षरी केल्याने दोन्ही देशांमधील हवाई सेवांच्या तरतूदीसाठी एक आराखडा तयार करण्यात येईल असे केंद्रा सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. २०१२ च्या जनगणनेनुसार, गयानामध्ये भारतीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकसंख्येच्या ४० टक्के लोकांचा समावेश असलेला हा सर्वात मोठा वांशिक गट आहे.
भारत आणि गयाना यांच्यातील हा करार दोन्ही देशांमधील हवाई संचालनासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. सध्या भारताचे जवळपास ११० देशांशी हवाई सेवा करार आहेत. भारत आणि कोऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयाना यांच्यातील नवीन हवाई सेवा करार दोन्ही बाजूंच्या वाहकांना व्यावसायिक संधी प्रदान करेल. तसेच, प्रगत कनेक्टिव्हिटीसाठी हे एक चांगले पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील
मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी
आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!
भारत सरकार आणि गयाना सरकारचे प्रतिनिधीत्व करणारी शिष्टमंडळ ६ डिसेंबर २०१६ रोजी बहामासच्या नासाऊ येथे एका हवाई सेवा करार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले. त्याच वेळी भारत आणि गयाना यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात होती . याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने शिकागो कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशनच्या दुरुस्तीशी संबंधित तीन प्रोटोकॉलच्या मंजुरीलाही मान्यता दिली आहे.