एअर इंडियाची थेट अमेरिका वारी

एअर इंडियाची थेट अमेरिका वारी

एअर इंडिया लवकरच भारतातून बंगळूरू ते सॅन फ्रान्सिस्को आणि हैदराबाद ते शिकागो थेट विमानसेवा सुरू होणार आहे. 

येत्या वर्षात प्रवाशांना ही अनोखी भेट मिळणार आहे. दिनांक ९ जानेवारीपासून आठवड्यातून दोन वेळेला बंगळूरू- सॅन फ्रान्सिस्को सेवा चालू होईल. बोईंग ७७७-२००एलआर जातीचे विमान या मार्गासाठी वापरण्यात येणार आहे. फ्लाईट क्र. ए.आय-१७५ हे बंगळूरू वरून सॅन फ्रान्सिस्कोसाठी सोमवारी आणि गुरूवारी दुपारी २.३० वाजता रवाना होईल आणि सॅन फ्रान्सिस्कोला संध्याकाळी ५ वाजता पोहोचेल. या मार्गावरील परतीचे विमान फ्लाईट क्र. ए.आय.-१७६ सॅन फ्रान्सिस्कोवरून शनिवारी आणि मंगळवारी रात्री ७.३० वाजता निघेल आणि बंगळूरूला पहाटे २.३० ला पोहोचेल.

हैदराबाद येथून शिकागोसाठी फ्लाईट ए.आय-१०७ प्रत्येक शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता निघून त्याच दिवशी संध्याकाळी ६.०५ वाजता पोहोचेल. परतीचे विमान फ्लाईट क्र. ए.आय- १०८ शिकागोवरून रात्री ९.३० वाजता निघून हैदराबादला रात्री १२.४० ला पोहोचेल.

सध्या भारतातून अमेरिकेसाठी दिल्ली वरून न्यु यॉर्क, नेवार्क, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को आणि शिकागो येथे तर मुंबई ते नेवार्क अशी थेट विमानसेवा चालू आहे.

Exit mobile version