23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतएअर इंडिया- विस्तारा एअर लाइनचे विलीनीकरणाच्या दिशेने उड्डाण

एअर इंडिया- विस्तारा एअर लाइनचे विलीनीकरणाच्या दिशेने उड्डाण

मार्च २०२४ पर्यंत विलीनीकरण पूर्ण होण्याचा अंदाज

Google News Follow

Related

एअर इंडिया आणि विस्तारा एअर लाइनच्या विलीनीकरणाशी महत्वाची घडामोड समोर आली आहे. सुरू झाली आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यावर काम सुरू केले आहे. .अधिकाऱ्यांची टीम विलीनीकरणाला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. सध्या दोन्ही विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी डेलॉइट या सल्लागार संस्थेची मदत घेतली जात आहे.

विलीनीकरणासाठी जागतिक स्पर्धा नियामकांकडून मंजुरी आवश्यक आहे. यानंतर, विमान नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ,भारतीय स्पर्धा आयोगआणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांच्याकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

गेल्या वर्षी टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइनच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती. सिंगापूर एअरलाइन्सने विलीनीकरणानंतर विलीन झालेल्या संस्थेमध्ये २५.१ टक्के भांडवल गुंतवनार असल्याचे सांगितले होते. मार्च २०२४ पर्यंत विलीनीकरण पूर्ण होणार आहे. विस्तारा एअरलाइन्स मध्ये टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचे ५१:४९ असे भांडवल आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!

एअर इंडियाने याच आठवड्यात बोईंग आणि एअरबसला ४७० नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. आणि कंपनीकडे याशिवाय आणखी ३७० विमाने ऑर्डर करण्याचा पर्याय आहे.या ऑर्डरनंतर एअर इंडियाला ६,५०० पेक्षा जास्त अधिक वैमानिकांची गरज भासू शकते. सध्या एअर इंडियाकडे ११३ विमानांचा ताफा चालवण्यासाठी सुमारे १,६०० वैमानिक आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विमानांची ऑर्डर देण्याचा हा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी अमेरिकन एअरलाइन्सने २०११ मध्ये ४६० विमानांची ऑर्डर देऊन विक्रम नोंदवला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा