आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी एअर इंडिया एकदा सज्ज झाली आहे. एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाकडे आल्यानंतर आता एअर इंडियाने आधुनिकीकरणावर भर दिला आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बहुतांश विमाने जुनी आहेत. एमिरेट्स आणि कतार एअरवेजसारख्या मोठ्या विमान कंपन्यांना आव्हान देण्याची तयारी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एअर इंडियानेही ५०० नवीन विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. नागरी विमान वाहतूक इतिहासातील हा सर्वात मोठा करार असल्याचे मानले जात आहे. हा खरेदी करार १०० अब्ज डॉलर्सचा असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या करारांतर्गत एअर इंडिया एअरबस आणि बोईंगकडून ही विमाने खरेदी करणार आहे. कंपनी पुढील आठवड्यापर्यंत या डीलबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर आता हवाई प्रवाशांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर विमान कंपन्या आता स्वतःला अपग्रेड करण्यात व्यस्त आहेत. टाटा समूहाने एअर इंडिया आपल्या ताब्यात घेऊन एक वर्ष झाले आहे. टाटा समूहाच्या देखरेखीखाली एअर इंडिया सध्या नव्या स्थित्यन्तरातून जात आहे.
हे ही वाचा:
महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दिनदयाळ उपाध्याय
फक्त ५०० रुपये दिले नाहीत म्हणून केला खून
रोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?
उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?
एअर इंडियाने २७ जानेवारी रोजी आपल्या कर्मचार्यांना पत्र लिहून नवीन विमान ऑर्डर करत असल्याच्या ऐतिहासिक कराराची माहिती दिली. या व्यवहाराद्वारे एअर इंडिया स्वत:ला इंधन कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. इंधनाचा वाढत खर्च कमी करणे हा यामागील उद्देश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अहवालानुसार, एअर इंडिया एअरबसकडून २५० विमाने खरेदी करणार आहे, त्यापैकी २१० सिंगल एस्ले A320neos आणि ४० वाइड बॉडी A350s विमाने असतील. बोईंगकडून खरेदी केल्या जाणार्या २२० विमानांपैकी १९० विमाने ७३७ मॅक्स नॅरोबॉडी जेट आणि २० विमाने ७८७ वाइडबॉडी जेट आणि दहा 777xs विमाने असतील. आतापर्यंत या कराराला एअरबस किंवा एअर इंडियाने दुजोरा दिलेला नाही.