आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. भारत सरकारने ऑस्ट्रेलियासोबत एअर बबल कराराला अंतिम रूप दिले आहे. ज्यामुळे सर्व पात्र प्रवाशांना दोन्ही देशांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी मिळेल, असे लाइव्हमिंटने वृत्त दिले आहे.
द्विपक्षीय हवाई बबल ही कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान दोन देशांदरम्यान पूर्व अटींसह उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची यंत्रणा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय उड्डाणे किमान ३१ जानेवारीपर्यंत निलंबित राहतील. तथापि, द्विपक्षीय हवाई बबल करारांतर्गत समर्पित मालवाहू उड्डाणे आणि प्रवासी उड्डाणे चालूच राहतील.
ऑस्ट्रेलियन एअरलाइन क्वांटासने अलीकडेच सिडनी आणि नवी दिल्ली दरम्यान उड्डाणे सुरू केली आहेत. ख्रिसमसपूर्वी नवी दिल्ली आणि मेलबर्न दरम्यान विमानसेवा सुरू करणार आहे. सध्या भारताचे ३३ देशांसोबत द्विपक्षीय हवाई बबल करार आहेत.
भारत सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित करण्यापूर्वी एअर इंडियाने नवी दिल्लीला मेलबर्न आणि सिडनीशी जोडणारी थेट उड्डाणे चालवलीत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एअर इंडियाची उड्डाणे येत्या काही दिवसांत पुन्हा सुरू होतील. ऑस्ट्रेलिया विमान कंपनीसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्हाला चांगली मागणी अपेक्षित आहे, असे एअरलाइनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हे ही वाचा:
DRDOकडून सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडोची यशस्वी चाचणी
स्मिता पाटील …. बोलका चेहरा आणि मुद्देसूद बोलणं
भारतीय नौदल होणार आता आणखी ‘स्मार्ट’
२३ मार्च २०२० पासून भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित केले होते. कोविड-१९ च्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका येत असल्याने, भारताने नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करणे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. ज्या देशांशी हवाई बबल करार आहेत तेथेच उड्डाणे सुरू आहेत.