दोन दशकानंतर टाटा समूहाचा आयपीओ शेअर बाजारात येणार

कंपनीने अद्याप आयपीओची किंमत जाहीर केलेली नाही

दोन दशकानंतर टाटा समूहाचा आयपीओ शेअर बाजारात येणार

तब्बल २० वर्षांनंतर म्हणजेच दोन दशकानंतर टाटा समूहाचा आयपीओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफारिंग येत आहे. शेअर बाजारात या आयपीओची चर्चा असून गुंतवणूकदारांचे याकडे लक्ष असणार आहे. टाटा समुहाला टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ लाँच करण्यासाठी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. परंतु, कंपनीने अद्याप आपल्या आयपीओची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, या क्षेत्रातील तज्ञांच्या मतानुसार, या आयपीओची किंमत २६८ रुपये प्रति शेअर असू शकेल.

टाटा समूहाने अद्याप टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लॉन्च करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ गेल्या आठवड्यात ग्रे मार्केटमध्ये ८४ रुपयांच्या प्रीमियमवर होता. या आठवड्यात १०० रुपयांपर्यंत वाढला आहे. अवघ्या एका आठवड्यात प्रति शेअर १६ रुपयांची वाढ दिसून आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

टाटा समूहाला कंपनीचा प्राईस बँड ठरवण्यासाठी एक ते दीड महिना लागू शकतो. त्यानंतरच कंपनी आयपीओच्या सबस्क्रिप्शनची तारीख जाहीर करेल. कंपनीचा आयपीओ ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानच येईल, अशी शक्यता आहे.

हे ही वाचा:

कोंढव्यातील दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीमध्ये टाटा मोटर्सची ७४.६९ टक्के, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ३.६३ टक्के आणि अल्फा टीसी होल्डिंग ७.२६ टक्के आहे. ही कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी आहे जी अभियांत्रिकी सेवा पुरवते. कंपनी मशिनरी, ऑटो, एरोस्पेस सारख्या उत्पादनांच्या निर्मितीमध्ये मदत करते. या कंपनीचा व्यवसाय भारत, अमेरिका आणि युरोपमध्ये पसरलेला आहे.

Exit mobile version